अवैध दारूप्रकरणी एक ताब्यात

आरोसबागमध्ये कारवाई : नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

⚡बांदा ता.१८-: : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोलगाव येथील एकावर आज पोलिसानी कारवाई केली. ही कारवाई आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोसबाग शेर्ले येथे करण्यात आली. या प्रकरणी गणपत माईनकर (वय 27, रा. कोलगाव चाफेआळी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटार आणि अवैध दारू असा एकूण 9 लाख 5 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

You cannot copy content of this page