उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कॅम्पमध्ये १३ मुलांची होणार ऑपरेशन

भाजप नेते युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते झाले उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरात उपजिल्हा रुग्णालयात आज वैद्यकीय कॅम्प आयोजित करण्यात आला असून, या कॅम्पसाठी 10-12 तज्ञ डॉक्टर सावंतवाडीत आले असून, यामध्ये लहान मुलांची 13 सर्जिकल ऑपरेशन होणार आहेत. या कॅम्पचे उद्घाटन सावंतवाडीचे युवराज तथा भाजपचे युवा नेते लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते. हा उपक्रम डॉ. अमोल पावसकर, डॉ. दूर्भाटकर, यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. येथील गरीब कुटुंबांतील मुलांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला होता. या सर्व डॉक्टरांनी राबविलेल्या या उपक्रमाचे भाजपच्या वतीने कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page