जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये किरण सी आर्म एक्सरे यंत्र किरण व ऑर्थोपेडिक पूर्णपणे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रो मेन्यूअल सी आर्म एक्स-रे टेबल व एक्स-रेडिएशनल प्रोटेक्शन लीड ऍप्रन व त्याला लागणारी उपकरणे यासाठी अकरा लाख पन्नास हजार रुपयांची जिल्हा नियोजन मार्फत अस्थिरोग (हाडाची शस्त्रक्रिया) करण्यासाठी आधुनिक पद्धतीची रुग्णांना दिलासा देणारी मशीन व त्यावर लागणारी उपकरणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधी मंजूर करून मिळावा, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातून विविध रुग्ण येत असतात. यासाठी हाडांची शस्त्रक्रिया करण्यासाठी गोवा बांबुळी नाईलाजास्तव रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पाठवावे लागतात
सावंतवाडी मध्ये डॉक्टर अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल अवधूत ( ऑर्थोपेडिक तज्ञ ) हे काही महिन्यापूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले असून सावंतवाडी मध्ये या रुग्णालयामध्ये किरण सी आर्म एक्स रे यंत्र व ऑर्थोपेडिक पूर्णपणे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रो मेन्यूअल सी आर्म एक्स-रे टेबल व एक्स-रेडिएशनल प्रोटेक्शन लीड ऍप्रन अशा प्रकारची मशिनरी व त्याला लागणारी उपकरणे उपलब्ध झाल्यास रुग्णांची
अवघड हाडांची शस्त्रक्रिया तसेच या आधुनिक मशनरी मुळे अनेक रुग्णांना पाठीच्या मणक्याचा आजार असल्याने या यंत्राद्वारे पाठीच्या मणक्यामध्ये नस दबलेली असल्यास इंजेक्शनद्वारे तसेच या आधुनिक मशनरी मुळे अचूक निदान करून रुग्णाला उपचारवर होऊ शकतात त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळू शकतो तसेच या मशनरी मुळे दोन हाडांच्या मध्ये स्टीलचा रॉड टाकून तसेच कमरेच्या खालील खुब्यामध्ये शस्त्रक्रिया करायचे असल्यास या आधुनिक मशनरीमुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करणे सोपे होऊन अनेक वयस्कर रुग्ण तसेच महिला तरुण अशा विविध रुग्णांना हाडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी या आधुनिक मशनरी मुळे दिलासा मिळुन शकतो
यासाठी आपण वरील प्रमाणे अकरा लाख पन्नास हजार रुपये जिल्हा नियोजन मार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधी प्राप्त करून दिल्यास गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद मिळून आपल्याला वेगळा आनंद मिळू शकतो. यासाठी जिल्हा नियोजन मार्फत निधी प्राप्त करून मिळावा अशी मागणी केली आहे
