मालवण शहर महिला काँग्रेसच्यावतीने आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

⚡मालवण ता.१८-: मालवण शहर महिला काँग्रेस वतीने कोल्हापूर उत्तर येथील नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..

काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर उत्तर येथील विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत विजय प्राप्त झालेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला होत त्यावेळी कोल्हापूर येथे मालवण मधील काही पदाधिकारी अरविंद मोंडकर यासोबत प्रचारात सहभागी झाले होते या विजया नंतर मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने शहरात फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला होता

कोल्हापूर येथील अरुणीमा सुनील माने यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अरविंद मोंडकर व महिला काँग्रेस पदाधिकारी गेले असता त्या ठिकाणी आमदार जयश्री जाधव यांची देखील भेट झाली या दरम्यान आमदार जयश्री जाधव यानी आपण लवकरच मालवणला येऊ असे सांगितले

यावेळी अरविंद मोंडकर, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष गीता नेवाळे,
ऍड.अमृता मोंडकर, युवक काँग्रेसचे योगेश्वर कुर्ले, विद्या फर्नांडिस, साक्षी नेवाळे उपस्थित होते.

You cannot copy content of this page