तब्बल सात वर्षांनी होणार निवडणूक : ३०५६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
⚡मालवण ता.१८-: तब्बल सात वर्षांनी होणाऱ्या मालवण तालुका खरेदी विक्री संघ लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६ मतदार संघातून एकूण ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ३०५६ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत मालवण तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक १३ नोव्हेंबर रोजी होत असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत पॅनल, स्व. सुनील मलये परिवर्तन पॅनलच्या तसेच राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित उमेदवारांनी अर्ज दाखल करत ही निवडणूक लक्षवेधी बनवली आहे.
मालवण तालुका खरेदी- विक्री संघाची स्थापना १९२८ साली झाली. खरेदी विक्री संघाची निवडणूक अनेक वर्षे बिनविरोध झाली होती. तर काहीवेळा राजकीय इर्षेनेही निवडणूका झाल्या. यावेळीची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत असून तालुक्यातील ३३ सोसायटीपैकी २९ सोसायट्यानी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत संस्था गटातून निवडून देणाऱ्या सहा सदस्यांसाठी मतदान करण्यासाठी आपल्या मतदार संघाचा ठराव दिलेला आहे. या गटातून सहा सदस्य खरेदी – विक्री संघावर निवडून जाणार आहेत, महिला दोन, अनुसूचित जाती जमाती एक, इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) एक, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून एक आणि वैयक्तिक गटातून चार असे पंधरा सदस्य निवडून देण्यात येणार आहेत.
या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मेढा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली. यामध्ये भाजप पुरस्कृत पॅनलने आपल्या २२ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. तर स्व. सुनील मलये परिवर्तन पॅनलने ९ उमेदवार उभे केले आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण ५७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये संस्था मतदार मतदार संघ- विनायक शिवराम बाईत, श्रीकांत बाबाजी बागवे, अरुण शांताराम भोगले, कृष्णा पांडूरंग चव्हाण, व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस, उदय राजाराम दुखंडे, राजन जगन्नाथ गावकर, संतोष लक्ष्मण गांवकर, महेश बाळकृष्ण मांजरेकर, अशोक आत्माराम नांदोसकर, विठ्ठल विठठल लक्ष्मण नाईक, महाभोज सदाशिव नारायण, चेतन प्रमोद मुसळे, सतिश दामोदर परुळेकर, प्रफुल्ल वासुदेव प्रभू, अभय सखाराम प्रभुदेसाई, राजेंद्र नारायण प्रभुदेसाई. व्यक्ती मतदार मतदार संघ- महेश मनोहर अंधारी, सौगंधराज रामकृष्ण बादेकर, राजन धोंडी भोजने, कृष्णा पांडूरंग चव्हाण, संतोष शांताराम चव्हाण, ज्ञानदेव दत्ताराम ढोलम, कृष्णा हरिश्चंद्र ढोलम, विजय वसंत ढोलम, संतोष लक्ष्मण गावकर, गोविंद बाळकृष्ण गावडे, महेश लक्ष्मण गावकर, रमेश बापू हडकर, देवानंद मेघश्याम लुडबे, मनोज मंगलदास लुडबे, संतोष कृष्णा लुडबे, चंदन दयाळ पांगे, मनोज गणपत राऊत, अशोक वासुदेव सावंत, अरुण दत्ताराम तळगावकर, सुभाष राजाराम तळवडेकर, राजन आप्पा वराडकर. अनुसूचित जाती जमाती मतदार संघ – नागेश बाबली अटक, सुरेश ज्ञानदेव चौकेकर, सदाशिव नारायण महभोज, राजेश शिवराम तांबे. इतर मागास प्रवर्ग मतदार संघ- कृष्णा हरिश्चंद्र ढोलम, विजय वसंत ढोलम, श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, सुभाष राजाराम तळवडेकर. भटक्या विमुक्त जाती/ जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ – मेघनाद गणपत धुरी, यशवंत विलास पराडकर, अशोक लाडोबा तोडणकर, महिला राखीव मतदार संघ- मनाली महेश चव्हाण, मनवा महेश गावकर, पुजा प्रमोद करलकर, सीमा सुभाष कवटकर, साक्षी भगवान लुडबे, निना गोविंद मुंबरकर, सरोज शिवाजी परब, अमृता अशोक सावंत या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून कोणतीही जागा बिनविरोध झालेली नाही अशी माहिती सहकार अधिकारी ए. आर. हिर्लेकर यांनी दिली.
या निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी- १९ रोजी सकाळी ११ वाजता, अंतिम उमेदवारी जाहीर करणे- २० रोजी सकाळी ११ वाजता, उमेदवारी मागे घेण्याची मुदत- २० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आहे. निशाणी वाटप ४ नोव्हेंबरला, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान होईल. त्याचदिवशी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ही सहकार अधिकारी ए. आर. हिर्लेकर यांनी दिली.
