मळगाव येथे १९ रोजी क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा उदघाटन सोहळा

कल्पवृक्ष दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मळगाव यांच्या सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) च्यावतीने आयोजन

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: कल्पवृक्ष शेतकरी गट संचालित कल्पवृक्ष दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था कुंभार्ली मळगाव यांच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) च्यावतीने बुधवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा भव्य उदघाटन मळगाव येथील कल्पवृक्ष दूध शीतकरण केंद्र (मळगाव पोकळे सॉमील) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री. सतेज उर्फ बंटी पाटील आहेत. तर यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संघ, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक महेश सारंग, सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक विद्याधर परब, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक गजानन गावडे, सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक रवींद्र मडगावकर, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर संचालक अरुण डोंगळे, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर संचालक कणीसिंह गायकवाड, सिंधुदुर्ग दुग्ध व्यवसाय विकास अधिकाटी योगेश गोसावी, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर संचालक दयाजी शेळके, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले, सहकारी संस्था, दूध, सिंधुदुर्गसहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप, मु. का. अ. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रमोद गावडे, डॉ. हेडगेवार प्रकल्प माणगाव अध्यक्ष सुनिल उकिडवे, अर्चना खानोलकर, गोकुळ विस्तार अधिकारी भगवंत गावडे, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, भगीरथ प्रतिष्ठान झाटाप अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, पशुवैद्यकीय संकलन अधिकारी डॉ. नितीन रेडकर, गोकुळ विस्तार अधिकारी राजेश गावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्पवृक्ष शेतकरी गट व कल्पवृक्ष दुग्ध व्यावसायिक संस्था कुंभार्ली मळगावच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page