⚡कणकवली ता.१७-: कणकवली महाविद्यालयात लिटररी असोसिएशन व ग्रंथालयाच्यावतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मंगलदास कांबळे, डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा.हरिभाऊ भिसे, ग्रंथपाल विजय परब, सहायक ग्रंथपाल अनिल(आप्पा) राणे, प्रा. डॉ. भिकाजी कांबळे,प्रा.स्वीटी जाधव,रत्नू गावडे,प्रशांत राणे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.मंगलदास कांबळे म्हणाले, राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लहानपणापासूनच वृत्तपत्र वाचनाची स्वतः मध्ये आवड निर्माण केली. वाचनाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हे अब्दुल कलाम यांच्या जडणघडणीतून दिसून येतो.त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन आयुष्यात वाचनाला जास्तीत जास्त महत्त्व द्यावे असे मार्गदर्शनात्माक प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ.मुंबरकर म्हणाले, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कष्टातून ‘मिसाईल मॅन’ पर्यंतची झेप घेतली. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वेळ आणि शिस्तीला महत्त्व दिले. त्यांच्या विचारांचे आचरण आज प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.आयुष्यात वाचन हे महत्त्वाचे असून प्रत्येकाने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी काढलेली पुस्तकरूपी रांगोळी सर्वांचे लक्ष लक्ष वेधून घेत होती.प्रा.हरीभाऊ भिसे यांनीही वाचनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रंथपाल विजय परब यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या युक्ती प्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचन करावे असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थिनी रसिका बाईत,प्रा.सीमा हडकर, प्रा. स्वीटी जाधव यांनी कविता वाचन केले. सूत्रसंचालन विद्यार्थी बुद्धेश सावंत याने केले
प्रास्ताविक प्रा. सीमा हडकर तर आभार प्रा. स्वीटी जाधव यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
