अँटी करप्शन कार्यालयावर उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भव्य मोर्चा…

संजय पडते; शिवसेनेचे कार्यकर्ते पैशाच्या अमिषाला बळी पडणार नाही..

⚡सावंतवाडी ता.१७-: आमदार वैभव नाईक शिवसेनेत मध्ये निष्ठे राहिल्याने गद्दार खोका सरकारला अँटी करप्शन कडून चौकशीचे नोटीस देऊन नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर उद्या कुडाळ येथ महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुडाळ येथील एंटी करप्शन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी पडते पुढे बोलताना म्हणाले की वैभव नाईक यांच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी वैभव नाईक याला बळी पडणार नाहीत या आधी देखील नाईक यांनी दहशतवाद विरोधात लढा दिला होता त्यामुळे वैभव नाईक आशा धमक्याना भिक घालणार नाहीत असेही ते बोलतान म्हणाले.

तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कट्टर शिवसैनिक कार्यकर्त्यांना पैशाचे आम्हीच दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शिवसेनेचे संस्कार झालेले कार्यकर्ते काही झाले तरी या आमिषाला बळी पडणार नाहीत असेही पडते आणि यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी अतुल बंगे ,चंद्रकांत कासार, आबा सावंत ,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page