तळवणे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील रवळनाथ भजन मंडळ प्रथम

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील रवळनाथ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय सद्गगुरुनाथ भजन मंडळ तुळस तर जय गणेश भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत तब्बल नऊ भजन मंडळानी सहभाग घेतला होता. यात उकृष्ट गायक म्हणून सत्यनारायण कळंगुटकर यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे परिक्षण दिप्तेश मेस्री व भावेश राणे यांनी केले. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंहत परशुराम भारती भजन मंडळ मठवाडी, जयगणेश भजन मंडळ सुतारवाडी तळवणे, श्री देवी राष्टोळी भजन मंडळ नेतर्डे, स्वराभिषेक भजन मंडळ साटेली, सद्गगुरुनाथ भजन मंडळ तुळस , रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी, रवळनाथ भजन मंडळ पाडलोस, ब्राम्हणदेव भजन मंडळ मळेवाड, श्री देव इस्वटी भजन मंडळ या नऊ भजन मंडळानी सहभाग दर्शविला होता. यात शिस्तबध्द मंडळ म्हणून स्वराभिषेक साटेली, उकृष्ट कोरस गुरुकृपा तळवणे , उकृष्ट झांजवादक नामदेव गर्दे तुळस , उकृष्ट तबलावादक ओकांर तळवणेकर, उकृष्ट गायक सत्यनारायण कळंगुटकर , उकृष्ट पखवाजवादक शुभम गावडे , उकृष्ट हार्मोनियमवादक सुधीर परब,आदींना गौरविण्यात आले . या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन शार्दुल परांजपे व प्रविण बर्वे यांनी केले.

You cannot copy content of this page