बेनी डिसोजा यांची शिवसेना अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी निवड

⚡कणकवली ता.२९-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या उपजिल्हाप्रमुख पदी भिरवंडे येथील सामाजिक कार्यकर्ते बेनी डिसोजा यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीनंतर आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सामाजिक क्षेत्रात आणि विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेले बेनी डिसोजा यांचे पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांना अल्पसंख्यांक विभागाच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवडण्यात आली आहे. भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. ख्रिश्चन समाजातील विविध सामाजिक संस्थांमध्ये बेनी डिसोजा कार्यरत असून कॅॅथॅलिक पतसंस्थेचे ते संचालकही होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेच्या अल्पसंख्यांक गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदी त्यांची निवड झाली आहे.

You cannot copy content of this page