कंदंबाचे ब्रेक निकामी होवून एसटी बसला धडक

इन्सुली कालवा परिसरात साडेतीन वाजता घडला अपघात:कोणी जखमी नाही; एसटी अधिकारी पोहोचले नाही वेळेत अपघात स्थानी

बांदा ता. २९: कदंबा आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इन्सुली-कालवा परिसरात घडली. कदंबा बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर अपघाताची माहिती देऊनही एसटी प्रशासनाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी न पोचल्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कदंबा सावंतवाडी येथून पणजीच्या दिशेने जात होती. तर एसटी बस गोवा येथून देवगडला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी इन्सुली येथे हा अपघात घडला. सुदैवाने दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

You cannot copy content of this page