⚡मालवण ता.२९-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ५६ विद्यार्थ्यानी व कार्यक्रम अधिकारी यांनी आश्रितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पणदूर येथील संविता आश्रमाला भेट देऊन जुने कपडे, धान्य, किराणा आदी साहित्य मदत म्हणून सुपूर्द केले.
यावेळी आश्रमाचे व्यवस्थापक संदीप परब यांनी सर्वांचे स्वागत केले व आश्रमातील विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नेऊन माहिती दिली. तसेच तेथील काही आश्रितांशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवुन आणला.
