⚡वेंगुर्ला ता.२७-: विकासाची सुरुवात ही नेहमी समाजकारणाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे सध्याच्या काळात युवकांनी समाजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवावा असे आवाहन जिल्हा युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी केले.
श्री.गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विकासामध्ये युवकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. यासाठी जिल्ह्यातील युवकांना समाजकारणात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लवकरच तालुकास्तरावरील युथ संस्थेत बदलही करणार असल्याचे सांगितले.
