नगरवाचनालयाच्या पुरस्कारांचे २ ऑक्टोबरला वितरण

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगरवाचनालयाच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात होणार आहे.

  यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी गायत्री बागायतकर, सुभाष साबळे, शैलजा वेटे यांच्यासह जिल्हापरिषद नवभारत विद्यालय केळुस यांना दै. तरुण भारतचे सिधुदुर्ग आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
You cannot copy content of this page