कणकवलीत भाजपच्या रक्तदान शिबिराच्या आम. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

⚡कणकवली ता.२७-: भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरावड्यानिमित्त कणकवली तालुका भाजप आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या येथील दुर्गा मातेच्या मंडपात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याच्यात कणकवली, देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा मतदार संघ समन्वयक मनोज रावराणे,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, युवक जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे,माजी सभापती दिलीप तळेकर प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत सरपंच पंढरी वायगणकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवक शहर अध्यक्ष गणेश तळेगावकर,सागर राणे,सर्वेश दळवी,नितीन पाडावे, प्रज्वल वर्दंम, समीर प्रभूगावकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page