लायन्स क्लबतर्फे श्रीकृष्ण बागवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.२७-: लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने सर्जेकोट मिर्याबांदा शाळेचे मुख्याध्यापक व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकृष्ण बागवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मालवण येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून लायन्सचे झोन अधिकारी सागर तेली यांच्या हस्ते बागवे यांना सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असल्याचे श्रीकृष्ण बागवे यांनी सांगत पुरस्कारासाठी निवड केल्या बद्दल लायन्स क्लबचे आभार मानले. यावेळी मान्यवरांनी श्रीकृष्ण बागवे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. तर सागर तेली यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, लायन्स सदस्य डॉ. शशिकांत झाट्ये, सौ. जयश्री हडकर, उमेश नेरूरकर, विश्वास गांवकर, गणेश प्रभुलकर, नाना साईल, दत्ताराम रेवंडकर, जि. प.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुरुनाथ ताम्हणकर, सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर, राज्य आदर्श शिक्षक शिवराज सावंत, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी शिवराज सावंत, अंकुश कणेरकर, कनेरकर मॅडम, अमर वाघमारे, सौ. वाघमारे मॅडम, मसुरेचे माजी उपसरपंच अशोक बागवे, सौ. श्रद्धा बागवे, प्रताप बागवे, मनिषा दाते, प्रज्ञाली कासले तसेच लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page