“त्या” कोसळलेल्या फुटपाथ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक…

बांधकाम विभागाला घेराव घालत विचारला जाब…

⚡सावंतवाडी ता.२७-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराव घालून कोसळलेला फुटपाथ दुरुस्त करण्याबाबत जाब विचारला व त्यांना या फुटपादाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट रेवती राणे महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरीच्या निरीक्षक दर्शना बाबर देसाई युवती जिल्हाध्यक्ष सावले पाटकर महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी हिदायतुल्ला खान संतोष जोईल राकेश नेवगी काशिनाथ दुभाषी हर्षद बेग ,याकुब शेख,आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page