कै. नीलकंठ श्रीधर दीक्षित यांच्या पुण्यस्मरणार्थ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…

देवगड-प्रतिनिधी
कै.नीलकंठ श्रीधर दिक्षित यांचे पुण्यस्मरनार्थ पुरस्कृत, कै.अथर्व अशोक दिक्षित चषक जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने 2 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा खुला व शालेय गटामध्ये होणार आहे.

खुला गट प्रथम क्रमांक 3000/- चषक, व्दितीय क्रमांक 2000/- चषक, तृतीय क्रमांक 1500/- चषक, चतुर्थ क्रमांक 1000/- चषक, पंचम क्रमांक 700/- चषक, उत्कृष्ट महिला प्रथम क्रमांक 1000/- चषक, व्दितीय क्रमांक 700/-,तृतीय क्रमांक 500/-, उत्कृष्ट देवगड तालुका खेळाडू प्रथम क्रमांक 700/- चषक, व्दितीय क्रमांक 600/-,तृतीय क्रमांक 500/-, 9 वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक 700/- चषक, व्दितीय क्रमांक 500/-, 17 वर्षाखालील गटासाठी प्रथम क्रमांक 1000/- व चषक , व्दितीय क्रमांक 700/-, 14 वर्षाखालील प्रथम क्रमांक 1000/- चषक,व्दितीय क्रमांक 700/-, हि स्पर्धा साखळी सामन्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरु होईल स्थळ मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे उत्कृष्ट तालुका खेळाडू कणकवली,वेंगुर्ला,मालवण,कुडाळ,सावंतवाडी,वैभववाडी,दोडामार्ग प्रथम क्रमांक प्रत्येकी 700/- चषक, अधिक माहितीसाठी राजा भुजबळ,सुयश पेठे,अभिषेक सांगळे,राजदिप सावंत यांच्याशी संपर्क साधावा

You cannot copy content of this page