केसरकरांना जिल्ह्याचे पालकमंत्री नाकारून भाजपने आपला रस्ता साफ केला

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची टीका

सावंतवाडी ता.२५-:

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने काल संध्याकाळी महाराष्ट्रातील पालकमंत्री पद क्षिर केले असून, यामध्ये शिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जोर का झडका दिला आहे. त्यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद न देता मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देत सिंधुदुर्गातून त्यांना बाजूला करत भाजपने आपला रस्ता साफ केला असल्याची जोरदार टीका शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,

शिंदे गटाने राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी आमदार दीपक केसरकर यांच्यावर दिल्यानंतर ते हवेत गेले होते. परंतु, शिंदे फडणवीस सरकारने मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊन झडका दिला आहे. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करणारे केसरकर यांनी ५० खोके घेतले असल्याने ते आता विद्यमान सरकारवर काहीच बोलू शकत नाहीत. असा टोला लगावला आहे. शिंदे – फडणवीस सरकारने केसरकर यांची परिस्थितीत घर का ना घाट का? अशी केली असल्याचा जोरदार टोला लगावला आहे. शिवसेना ज्यांनी ज्यांनी सोडली ते संपले हा शिवसेनेचा इतिहास आहे. आमदार दीपक केसरकर यांच्यावर देखील हीच वेळ येणार असून, आमदार म्हणून मतदारसंघात दुर्मिळ असणारे केसरकर आता अती दुर्मिळ होणार असल्याचा टोला रुपेश राऊळ यांनी लगावला आहे.

यावेळी वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आबा सावंत, विनोद ठाकूर, सुनील राऊळ, राजाराम गावडे, प्रशांत बुगडे, अजित सांगेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page