रुपेश राऊळ यांचे आवाहन
सावंतवाडी ता.१९-:आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या चष्मा कारखाना, आडाळी एम आय डी सी तसेच इतर उद्योगांचे काय झाले, आमदार होऊन 13 वर्ष झाली या अवधीत किती उद्योग आणले. हे जाहीर करावे. तसेच सावंतवाडीत भूमिपूजन करण्यात आलेल्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे काय झाले?, सावंतवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी मध्ये शिकून किती विद्यार्थी पुढे गेले हे जाहीर करावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
