म्हणून पुंडलिक दळवी हल्ल्या प्रकरणी केले नाही भाष्य;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची टीका
सावंतवाडी ता.१९-:सावंतवाडीवर बोलणारे केसरकर पुंडलिक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत काहीच का नाही बोलले ? असा प्रश्न शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान केसरकर यांनी नेहमी स्वार्थीच राजकारण केले आहे. नेहमी स्वार्थासाठीच त्यांनी आपली राजकीय वक्तव्य केली आहेत. त्यामुळेच केसरकर या हल्ल्याबाबत गप्प राहिले, अशी टीका त्यांनी केली.
