निगुडे माऊली नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी नारायण राणे

⚡बांदा ता.१९-: निगुडे येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी नारायण शांताराम राणे यांची नुकत्याच झालेल्या सभेत एकमताने निवड करण्यात आली तर गुरुदास वासुदेव गवंडे यांची सचिव पदी फेरनिवड झाली.


नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन ही बैठकीत करण्यात आले. निगुडे माऊली नवरात्र उत्सव समितीची सभा माऊली मंदिर सभागृहात झाली. यावेळी अध्यक्षपदी नारायण राणे , दीपक पांडुरंग गावडे (उपाध्यक्ष) समीर गावडे (कार्याध्यक्ष), गुरुदास गवंडे (सचिव), बाबली तुळसकर (सहसचिव), राजेश मयेकर (खजिनदार), संदीप राणे (सहखजिनदार) तसेच सदस्य उमेश गावडे, अजित तुळसकर, वासुदेव गावडे, महादेव नाईक, सुधीर गावडे, पुरुषोत्तम गावडे तसेच मार्गदर्शक गंगाराम गावडे आदी उपस्थित होते. भजने व सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी नियोजन करण्यात आले. सचिव गुरुदास गवंडे यांनी आभार मानले

You cannot copy content of this page