शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांची टीका
⚡सावंतवाडी ता.१९-: निष्क्रिय आमदार, टामटूम आमदार म्हणून आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना घेऊन आता आमदार दीपक केसरकर यांना शहरातील विकास कामाचे नारळ फोडावे लागत असल्याची टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमख चंद्रकांत कासार यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.
काहीच महिन्यांपूर्वी एक मेकांवर जोरदार टीका करणारे आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांना सावंतवाडीतील जनतेने जाब विचारायला हवा, की त्याची दिलजमाई कोणत्या गोष्टीवर झाली आहे.
