वैद्यकीय अधिक्षक डॉ एवळे यांना प्रशासनाची साथ नाही

वाहन सुद्धा नसल्याने ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या गर्तेत;नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी भेट घेत घेतली माहिती

⚡दोडामार्ग ता.१९-: डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांची सेवा चांगली आहे मात्र त्याना प्रशासनाची योग्य साथ मिळत नसल्याने रुग्णालय समस्यांच्या गर्तेत आहे, रुग्णालयातील रुग्णवाहिकेला चालक नसल्याने ह्या समस्येत आणखीनच भर पडली असून रुग्णांची ने आण तसेच औषध पुरवठा यावरही मर्यादा येत आहेत या साठी आज आपण वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेतल्याचे कसई दोडामार्ग नागरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी नगरसेवक तसेच नागरिकांसह भेट घेतली व चर्चा केली. यावेळी त्यांनी शल्य चिकित्सक श्री. पाटील यांच्याशीही चर्चा केली व चालक लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आपण मंत्र्याशीही बोलण्यास तयार असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, नगरसेविका क्रांती जाधव, नगरसेविका गौरी पार्सेकर, सरपंच देवेंद्र शेटकर, सरपंच पराशर सावंत माजी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, स्वप्नील गवस,सुमित म्हाडगुत शशांक नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page