वाहनचालकांना दिले सुरक्षेचे धडे
⚡बांदा ता.१७-: इन्सुली आरटीओ चेक नाका येथे सिंधुदुर्ग परिवहन विभागाच्या वतीने शनिवारी १७ सप्टेंबर रोजी चालक दिन साजरा करण्यात आला. आरटीओ निरीक्षक जे. एम. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून व वाहन चालकांना सुरक्षित वाहतूक करण्याचा संदेश देत चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यासाठी बांदा येथील प्रथित यश उद्योजक व अनिल मोटर ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक अनिल पावसकर यांनी पुढाकार घेतला. १७ सप्टेंबर हा दिवस परिवहन विभागाच्या वतीनं चालक दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने वाहतूक शाखा वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतूक करण्याचं समुपदेशन करते, शिवाय वाहन चालकांना त्यांच्या सुरक्षित ड्रायव्हिंग बाबत धडे दिले जातात. कज बांदा इन्सुली नाक्यावर हा दिवस साजरा करण्यात आला. अनेक वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन सुरक्षित व काळजीपूर्वक वाहन चालविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी आरटीओ क्लार्क मंगेश गायकवाड, मनोहर जाधव, आनंद म्हावलंकर, शेखर नाईक, प्रसाद गवंडळकर, प्रल्हाद देसाई, दिलीप बांदेकर आदी उपस्थित होते.
