⚡कणकवली ता.१७-:
कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न प्रशासनाने प्रामुख्याने सोडवावेत या संदर्भात कणकवली गोपुरी आश्रम येथे एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रामुख्याने दिव्यांगांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचतच नाहीत यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच दिव्यांगांची पेन्शन कायमस्वरूपी चालू राहावी ती किमान ५००० असावी. दिव्यंग अंत्यदय धान्य योजना कणकवलीत सर्व दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर सुरू करावी. दिव्यांगाणा विनाअट घरकुल उपलब्ध व्हावे तसेच त्यांची शंभर टक्के घरपट्टी माफ व्हावी व पाच टक्के अनुदान मिळावे. दिव्यांगाना उद्योग व्यवसायासाठी सरकारी जागेत स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. आणि रेल्वेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र बोगी पुन्हा सुरू करावी.सर्व शासकीय कार्यालयात दिव्यांग अधिनियम 2016 प्रसारित करण्यात यावा. अशा विविध मागण्या शासनाने आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीच्यावतीने आयोजित बैठकीत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुनील सावंत , उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सदये,खजिनदार बाळकृष्ण बावकर व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते
