पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिनानिमित्त आयोजन
वेंगुर्ला प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा वेंगुर्ला भाजपातर्फे सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. याचा शुभारंभ आज वेंगुर्ला किना-यावर स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. भाजपाच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी किना-याची स्वच्छता केली.
यावेळी जिल्हा सरचिटणी तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, नागेश गावडे, साक्षी पेडणेकर, ईशा मोंडकर यांच्यासह अॅड.सुषमा खानोलकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, सुरेंद्र चव्हाण, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, लायनेस क्लबच्या उर्मिला सावंत, मनवेल फर्नांडीस, निलेश मांजरेकर, पिटू सावंत, भुषण सारंग, अमेय धुरी, सुधीर पालयेकर, बाबुराव मेस्त्री, वेंगुर्लेकर, पडलिक हळदणकर, अशोक खराडे, सुधाकर वेंगुर्लेकर, रामचंद्र आरावंदेकर, देविदास मोटे, निलेश खडपकर, श्रीकांत तांडेल, अजय आरोलकर, फारुक हुसेन आदी उपस्थित होते.
