श्रावण नं. 1 शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡कणकवली ता.१७-: महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 ता. मालवण या शाळेत मुंबई भांडुप साहिल या ठिकाणच्या श्री स्वामी समर्थ मठाचे उपाध्यक्ष जयराम लक्ष्मण बाईत यांच्या प्रयत्नातून श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मुंबई भांडुप यांजकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनाचार लॉंग बुक, पेन्सिल, शॉर्पनर व खोडरबर अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शैक्षणिक साहित्य वाटप करताना जयराम लक्ष्मण बाईत यांचे बंधू सतीश लक्ष्मण बाईत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नागेश परब, साक्षी यादव हे उपस्थित होते. यावेळी प्रथम सतीश लक्ष्मण बाईत यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ मठाचे उपाध्यक्ष जयराम लक्ष्मण बाईत यांचा शैक्षणिक साहित्य वाटप करण्यापाठीमागचा उद्देश सर्व विद्यार्थी व पालकांना समजून सांगण्यात आला. हे शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पालकांच्यावतीने बाबाजी पाडावे, सुनील वेदरे, आरती हावळ, जितेंद्र लाड, सुवर्णा दळवी, रोहिणी पवार, प्रीती यादव, मानसी परब, निधी घाडी, वर्षा कोळंबेकर, दीपिका शिरवंडकर हे पालक उपस्थित होते. तर मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, सहकारी शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, सचिन घोटाळे या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचलन विनायक हरकुळकर यांनी केले.

You cannot copy content of this page