कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रंजन चव्हाण

⚡कणकवली ता.१७-: भारत सरकार मान्य वित्तीय संस्था कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्रिंबक गावचे सुपुत्र रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली.
कणकवली अर्बन निधी बँकेचे सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली, यावेळी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, खजिनदार प्रितम पारकर, संचालिका सौ. प्राची पारकर, बँक ऑफिसर सौ.प्रांजल राणे, सौ. भारती तांबे, यश घाडीगांवकर, अस्मा पटेल, सौ.दिव्या केणी, सौ. पूजा तोरस्कर आणि अभय सरमळकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

.

You cannot copy content of this page