Headlines

शहर भाजप व स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्यावतीने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत सेवा सप्ताह

अजय गोंदावळे ,निशांत तोरस्कर व बंटी पुरोहित यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

⚡सावंतवाडी ता.१७-:शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून, यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी २० व २१ सप्टेंबर ला काझी शहाबुद्दीन हॉल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच विविध आजारांवर उपचार केले जाणार आहेत. तसेच नेत्र तपासणी शिबिरात अल्प दरात चांगल्या दर्जाचे चश्मा वाटप करण्यात येणार आहे. तसेच २२ सप्टेंबर रोजी शहरातील युवकांसाठी युवा उद्योजकांचा संवाद कार्यक्रम होणार आहे.

You cannot copy content of this page