पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बांदा भाजपच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळवाटप करून साजरा

⚡बांदा ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा बांदा मंडलाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे रुग्णांना फळवाटप करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, राज्यपरिषद सदस्य मंदार कल्याणकर, माजी सभापती शितल राऊळ, सरचिटणीस मधुकर देसाई, बांदा सरपंच अक्रम खान, किसान मोर्चा अध्यक्ष प्रवीण देसाई, शेर्ले सरपंच उदय धुरी, एस. सी. मोर्चा अध्यक्ष किशोर जाधव, किसान मोर्चा जिल्हासरचिटणीस अजय सावंत, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, युवा तालुकाउपाध्यक्ष विनेश गवस, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका नाईक, महिला सचिव रूपाली शिरसाठ, महिला सचिव किशोरी बांदेकर, महिला सचिव राखी कळंगुटकर, सुनिल धामापूरकर, शाम सावंत, कैलास गवस, ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, निलेश देसाई यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रुग्णालयातील रुग्ण, आरोग्य कर्मचारी यांना फळांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने नेहमीच कार्यरत असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page