*”पाट हायस्कूलचे श्री. तानाजी काळे गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित”.

⚡कुडाळ ता.१७-: सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री सन्माननीय श्री. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते पार पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये पाट हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. तानाजी काळे सर यांना गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्माननीय श्री .तानाजी काळे सर यांनी इंग्रजी विषयासाठी जादा मार्गदर्शन वर्ग ,स्मार्ट पी.टी प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक ,ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक, इंग्लिश स्पिकिंग कोर्स ,जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीचे इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन, त्याचप्रमाणे संगीत विषयाची विशेष आवड असल्यामुळे नियमित परिपाठ, ईशस्तवन ,स्वागतगीत, कलाक्षेत्रातील परीक्षणही केलेले आहे. सरांना वाचनाची ही आवड आहे
या पुरस्कारामुळे त्यांचे जिल्ह्यात कौतुक होत असून एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट चे कार्याध्यक्ष श्री समाधान परब. श्री संजय ठाकूर. आणि सर्व संचालकांतर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले .विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शामराव कोरे, पर्यवेक्षक श्री. राजन हंजनकर ,शिक्षक प्रतिनिधी श्री. गुरुनाथ केरकर यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page