सावंतवाडीत 25 सप्टेंबर रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत बुदधिबळ व कॅरम सेमिनार

⚡सावंतवाडी ता.१७-: मुक्ताई ॲकेडमी आणि राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु.काॅलेज यांच्या संयुक्त विदयमाने पहीली ते महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी बुदधिबळ आणि कॅरम खेळांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.

सेमिनार रविवार दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 01.30 या वेळेत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.सेमिनारसाठी नावनोंदणी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर करायची आहे.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सेमिनारमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page