अन्यायकारक वागणूक मिळाल्याचा विलास साळसकर यांचा आरोप
⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेच्या पडत्या काळात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून देवगड तालुक्यात काम केले.मात्र पहिल्या फळीत आम्ही असण्याची गरज असताना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना चौथ्या-पाचव्या फळीत टाकण्याचे काम या शिवसेनेच्या नेत्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत आमदार वैभव नाईक यांनी आठही तालुक्यात गटातटाचे राजकारण निर्माण केल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केला आहे.
कणकवली कणकवली येथील शिवसेना शिंदे गट मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संदेश पटेल,सुनील पारकर,शेखर राणे, दिलीप गावकर व पदाधिकारी उपस्थित होते.
राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर २००७ पासून देवगड तालुक्यात ५ तालुकाप्रमुख झाले.कोण टिकले नाही,माझे व्यवसाय सोडून मी प्रामाणिक राहिलो.जे काही शिवसैनिक होते. त्यांना घेऊन काम केलं.गेले ५ वर्ष मी नाराज होतो.माझ्या जागेवर दोन तालुकाप्रमुख केले,त्यांना माझ्यावर व माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांवर लादले गेले.त्यामुळे मी नाराज होतोच, पदाधिकऱ्यांची नाराजी होती.त्याची समज घालून मी राहिलो होतो.पुन्हा चार विभागाचा तालुकाप्रमुख मला बनवण्यात आले.५ ऑगस्टला आ. वैभव नाईक यांनी फोन केला.बैठका नियोजन करायला सागितले.पुन्हा आ.नाईक फोन करतात ,तिकडचे काही पदाधिकारी म्हणतात,विलास साळसकर यांना बदला. त्यानुसार दुसऱ्याला तालुकाप्रमुख नेमले.
त्याची विचारणा आ.वैभव नाईक यांच्याकडे केली.त्यांनी तर खासदार व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर बोलावं लागेल,असे सांगितले.त्यानंतर काका राऊत यांना बोलावून उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.मी गेले वर्षभर तक्रारी केल्या आहेत त्यांना व आम्हाला एकत्र बसवा असे सांगितले.त्याच्या बैठका झाल्या नाहीत .
२२५ प्रतिज्ञापत्र केले ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या नेत्यांनी दिल्या. मी अरुण दुधवडकर यांच्यासोबत तीन तास मातोश्रीवर होतो,पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही भेटलो.पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळत नसेल,तर काय करायचे? म्हणून मी नाराजीने निर्णय घेतला.शिंदे गटात मी सहभागी झाला आहे.मी कुणाशीही चर्चा न करता मी निर्णय घेतला,असे साळसकर यांनी सांगितले.
मी सातत्याने खा.विनायक राऊत यांना भेटलो, दोन दोन वेळा भेटून सुद्धा निर्णय होत नसेल.काय उपयोग?यामागे आ.वैभव नाईक आहेत.माझ्यप्रमाणेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.मी पुढे आलो,आठही तालुक्यात नाराजी आहे.राणे विरोधात लढताना आम्ही होतो.ते सर्व आता आम्ही चौथ्या,पाचव्या फळीत गेलो.आम्ही ओवाळून टाकलेले कार्यकर्ते होतो,म्हणून शिवसेना खासदारांचा दोन वेळा विजय झाला.त्यावेळी गौरीशंकर खोत कुठे होते?गौरीशंकर खोत यांनी आठ तालुक्यात फिरावं,त्यांनी लोकांना भेटावे.शिवसेना उपनेते बनविण्यात विरोध कोणाचा होता?हे जाहीर करावे,असे साळसकर म्हणाले.
मिलिंद साटम यांनी विभाग बैठका लावायच्या आहेत.असे मिलिंद साटम यांनी फोन केला.त्यानंतर मॅसेज केला त्यात सगळ्यांची नावे होती.माझं नाव नसल्याने विचारणा केली.तेव्हा विचारणा केली,तेव्हा तुमच्याकडे पद नाही.तेव्हा साटम यांना संदेश पारकर,सतीश सावंत,अतुल रावराणे यांच्याकडे कुठले पद आहे? अशी विचारणा केली.
देवगड नगरंचायतीच्या सत्ताधारी लोकांची विश्वास गमवला आहे.आम्ही काम केलं त्यामुळेच विजय झाला.श्रेय मात्र दुसऱ्याने घेतले.कणकवलीत चमकेश गिरी करणारे नेते देवगडत आहे.संदेश पारकर यांनी राज्यात कणकवली जिंकली म्हणून श्रेय घेतल्याचा आरोप विलास साळसकर यांनी केला.
भास्कर जाधव यांना सिंधुदुर्गात फिरु देणार नाही
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली,त्यांनी अनेक पक्ष बदलले होते.अपक्ष निवडणूक लढवली.पराभव झाला, मातोश्रीवर जाणार नाही.मग राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यांना राष्ट्रवादी ने मंत्री केले,वैचारिक पातळी सोडून त्यांनी बोलू नये.भास्कर जाधव यांनी खालच्या पातळीवर टीका करू नये.बेताल वक्तव्ये करत आहेत ती थाबवावी.अन्यथा भास्कर जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही,असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे सुनिल पारकर यांनी दिला आहे.
