सावंतवाडी “त्या” टी-शर्टची चर्चा : दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात टीशर्ट दाखल
⚡सावंतवाडी ता.१७ प्रसन्न गोंदावळे-: राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ‘पन्नास खोके एकदम ओके’ असा आरोप सुरू आहे. मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात अशा घोषणा दिल्या जातात. त्यात आज सावंतवाडी तालुक्यात म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘पन्नास खोके एकदम ओके’ची टीशर्ट बाजारात आली असून युवकांच्या पाठीवर अशा प्रकारचे चित्र दिसल्याने सर्वत्रच चर्चा होत आहे.
गद्दारांना क्षमा नाही, असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी आयोजित मेळाव्यात सांगितले हाेते. या गद्दारांनी पन्नास खोके मिळवून स्वतःच एकदम ओके केलं असंही ते म्हणाले होते. त्यात आज अनेक युवक ‘पन्नास खोके एकदम ओके’ची टी शर्ट घालून सावंतवाडी बाजारपेठेत फिरत असल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे.
