मुलगी आर्वी हिच्या पहिल्या वाढदिनी अणाव आनंदाश्रमाला दिले जेवण

मळगाव येथील विशाल जाधव यांचा उपक्रम

सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जाधव यांचे पुत्र विशाल तुकाराम जाधव यांनी आपली मुलगी कु आर्वी हिच्या प्रथम वाढदिसानिमित्त अणाव येथील आनंदाश्रय या निराधार वृध्द आश्रमाला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपून एक दिवसीय जेवणाचा खर्च दिला.


यावेळी संस्थापक अध्यक्ष परब काका यांच्या सोबात विशाल जाधव, भाऊ विकास जाधव, उदय जाधव उपस्थित होते
या आश्रमात जिल्ह्यातील विविध भागातून निराधार महिला व पुरुष असे एकूण कर्मचारी मिळून ५० संख्या आहे ,दात्यांच्या मदितीच्या हातामुळे ही संस्था चालते. विशाल जाधव हे ऑल इंडिया एससी/ एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन ,कोंकण रेल्वेच्य्या कारवार विभागाचे ऑर्गनाझींग सेक्रेटरी आहेत, तर कोंकण रेल्वे च्य मान्यताप्राप्त युनियन, केआरसी एम्प्लॉइज युनियन व रेल कामगार सेना युनियनचे ब्रांच कमिटी सदस्य आहेत तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सारख्या चळवळींना जोडून आहेत. त्यांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या या दातृत्वाबद्दल अध्यक्ष श्री परब काका यांनी त्यांचे आभार मानले,

You cannot copy content of this page