पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र डोंगराची केली स्वच्छ्ता

सावंतवाडी शहर भाजपा व नगर परिषदेचा उपक्रम

सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरावडा अभियान उपक्रम निमित्ताने शनिवार सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर येथे सावंतवाडी शहर भाजप व सावंतवाडी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक राजू बेग महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर ,दिलीप भालेकर,संदेश टेमकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page