मनसेचे गिरीश उपरकर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा

आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना खाऊ व शैक्षणीक साहित्याचे केले वाटप

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ- : मनसेचे गिरीश उपरकर यांनी आपला वाढदिवस आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांबरोबर प्रत्यक्ष भेटून साजरा केला. यावेळी येथील मुलांसमवेत त्यांनी केक कापून मुलांना खाऊचे तसेच शैक्षणीक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळेला आपण आपल्या परीनं नक्कीच मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.


यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक, सचिव कौस्तुभ नाईक, अमितकुमार बागवे, शाखाध्यक्ष प्रविण आरोसकर, नंदू परब, मुकुंद धारगळकर, मनोज कांबळी, धनराज गोरे, निखिल काणेकर, शाळेचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक प्राणेश नाईक, कार्य वाहक गंगाराम शेळके, नंदा सावंत, क्रीडा निर्देशक नंदिनी आचरेकर, हस्तकला शिक्षिका सरोज चव्हाण, श्री गोडकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्राणेश नाईक यांनी मानले.

You cannot copy content of this page