सावंतवाडीत १७ दिवसांच्या गणरायांना निरोप

सालईवाडा मंडळ व नरसोबा मंदिरातील गणेशाचा समावेश

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी सालईवाडा येथे नव्याने विराजमान झालेल्या सर्व धर्म समभाव सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे तसेच जुना बाजार येथील नरसोबा मंदिरातील गणेशाचे भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी नरसोब मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या महादेवाचा देखावा खास आकर्षण ठरत होता.

यावेळी विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये ण्यासाठी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान विसर्जन स्थळी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page