पाटेश्वर मंदिरात १९ रोजी डबल भजनबारी

२१ दिवसांच्या गणेशोत्सव निमित्त आयोजन

बांदा/प्रतिनिधी
येथील श्री पाटेश्वर मंदिरातील बांदा पोलीस स्थानकाच्या २१ दिवसीय गणेशोत्सवाच्या निमिताने सोमवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ७ वाजता जंगी डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध बुवा विजय उर्फ गुंडू सावंत आणि विनोद चव्हाण यांच्यात हा भजनाचा सामना रंगणार आहे.
हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे बुवा गुंडू सावंत यांना पखवाज म्हणून विराज बावकर आणि तबला वादक म्हणून प्रदीप वाळके साथ करणार आहेत. तर श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी, कुडाळ बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज वादक म्हणून महेश परब तर तबला वादक म्हणून तुषार लोट साथ करणार आहेत. भजनप्रेमी रसिकांनी या डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बांदा पोलीस स्थानकाच्या वतीने पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page