साटेली भेडशीमध्ये कुष्ठरुग्ण, सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेला प्रारंभ

⚡दोडामार्ग ता.१६-: आरोग्य विभागाकडून दरवर्षी कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण मोहिम करण्यात येते. तशीच मोहीम यावर्षी देखील करण्यात येत आहे.साटेली भेडशीत आज पासून आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेत आशा व स्वयंसेवक नागरिकांच्या घरोघरी जात कुष्ठरोग किंवा क्षयरोग या रोगांची लक्षणे आहेत की नाही हे पाहतात.कुष्ठरोग किंवा क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला त्या तात्काळ आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन करतात.

You cannot copy content of this page