बांदा/प्रतिनिधी
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशाळेत हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित हिंदी कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या दिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी हिंदी भाषेतून संभाषण केले. मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्व विषद केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
पहिली व दुसरी गट – (प्रथम तीन क्रमांकानुसार)- युगंधरा ओगले, वंश राणे, श्रेया हळदणकर. तिसरी ते चौथी गट – आराध्या कुडव, अन्वयी पवार, वैभवी धुरी. पाचवी ते सातवी गट – रत्नाकर ओगले, संस्कार शिरोडकर, विहान अधिकारी. आठवी ते दहावी गट- अनुष्का पंडित, अल्फीया खतीब, सरहान खान.
स्पर्धेचे परीक्षण प्रशाळेच्या शिक्षिका सौ. रीना मोरजकर, सौ. सुमित्रा सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा नाईक यांनी केले.
फोटो:-
बांदा नाबर शाळेत कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका मनाली देसाई. सोबत इतर शिक्षक.
व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये हिंदी दीन उत्साहात साजरा…
