वराडकर हायस्कूल प्राथमिकमध्ये तर भंडारी हायस्कूल माध्यमिक विभागात प्रथम

मालवण तालुका विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

मालवण दि प्रतिनिधी

मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये येथील वराडकर हायस्कूल प्रथम, तर माध्यमिक विभागातून मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. ४९ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्यमहोत्सव पंचायत समिती शिक्षण विभाग, येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धिविनायक सभागृहात झाला.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी दीप प्रज्वलनाने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कट्टा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर होते. कट्टा मंडळाचे सचिव सुनील नाईक विजयश्री देसाई मंडळाचे सल्लागार व्हीक्टर डान्टस खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, पं. स. शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत, अजय शिंदे, टी. के. पाटील, कट्टा बीट शिक्षण विस्तार अधिकारी सविता परब, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, कट्टा कॉलेजचे प्राचार्य विनायक जमदाडे तसेच तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

निकाल असा प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती प्रथम- हर्षिता प्रकाश कानुरकर ( वराडकर हायस्कूल कट्टा ) द्वितीय हर्षिता रवींद्र गावकर (टोपीवाला कन्याशाळा, मालवण), तृतीय-ऋषी प्रशांत धुरी (शिवाजी विद्यामंदिर काळसे).

माध्यमिक विभाग विद्यार्थी प्रतिकृती-प्रथम श्रावणी श्रीराम गावकर (भंडारी हायस्कूल, मालवण), द्वितीय मिहीर मिलिंद गावकर ( प्रगत विद्यामंदिर रामगड ), तृतीय- राज उत्तम गावकर (त्रिमूर्ती विद्यालय शिरवंडे). निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग-प्रथम-आकांक्षा मंगेश तोंडवळकर (जि. प. पूर्ण प्रा. शाळा वरची तोंडवळी), द्वितीय – सान्वी संतोष म्हाडगूत (वरसकर विद्यामंदिर वराड), तृतीय- वेदिका मंगेश परब ( वर्दम हायस्कूल पोईप ). निबंध स्पर्धा-माध्यमिक विभाग- प्रथम- मिलिंद उज्वल मुरवणे (टोपीवाला हायस्कूल). द्वितीय – ओंकार वसंत वराडकर (वरसकर विद्यामंदिर वराड ), तृतीय- वैष्णवी नारायण जिकमडे (प्रगत विद्यामंदिर रामगड.) प्राथमिक विभाग- वक्तृत्व स्पर्धा-प्रथम-ध्रुवी महेश भाट ( वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ), द्वितीय- रोशन कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कूल), तृतीय-सई अंकुशराव घुटूकडे (न्यू इंग्लिश स्कूल आचरा) माध्यमिक विभाग-प्रथम-दर्श बलराम सामंत (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय-सम्राट बाबुराव राजे (भंडारी एज्युकेशन सोसायटी). तृतीय साक्षी रवींद्र जिकमडे (प्रगत विद्यामंदिर.) विज्ञान मेळावा उच्च माध्यमिक गट-प्रथम श्रेया समीर चांदरकर ( वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), द्वितीय-आर्यन देविदास प्रभूगावकर (टोपीवाला हायस्कूल) तृतीय – वेदांत संतोष गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल आचरा ). नाट्यमहोत्सव- प्रथम-भावेश वराडकर व इतर, भंडारी हायस्कूल मालवण, द्वितीय- पार्थ नलावडे व इतर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.

प्रयोगशाळा परिचर – प्रथम संदीप आ. धामापूरकर (शिवाजी विद्यामंदिर काळसे.) प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रथम देविदास ना. प्रभूगावकर (जि. प. प्रा. शाळा हडी नं. १), द्वितीय – गुरुनाथ च. ताम्हणकर (जि. प. मसुरे नं. १), तृतीय – दीपक ठाकरे (जि. प. ओवळीये नं. १) माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रथम- प्रकाश विठोबा कानूरकर ( वराडकर हायस्कूल कट्टा), द्वितीय-विष्णू राजाराम काणेकर (त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे), तृतीय- दिव्या काशिराम वाईरंकर ( वराडकर इंग्लिश मीडिमय स्कूल.)

यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे. मालवण वनपाल पी. व्ही. शिंदे यांनी व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सुत्रसंचालन वीणा शिरोडकर, किसन हडलगेकर, प्रकाश कानूरकर यांनी केले. प्रास्ताविक संजय नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page