वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ शिवसेना, युवासेनेचे आंदोलन

स्वाक्षरी मोहीम राबवत वेधले लक्ष

वेंगुर्ले
महाराष्ट्रच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांत कंपनीचा १.४५ लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रतून गुजरातला गेल्याने आज शिवसेना व युवासेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच निषेध स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, वेदांग पेडणेकर, समृद्धी कुडव, मेरी फर्नांडिस, मनाली हळदणकर, वैभव फटजी, वेदांत वाडेकर, चिन्मय डुबळे, वेंगुर्लेकर, किरण सावंत, कांता घाटे, सुहास मेस्त्री, अभि मांजरेकर, संतोष कुडव आदींसह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page