⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत शाळा कुणकेरी नं. १ च्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
वैभव महादेव परब व ईशांत परशुराम परब हे इयत्ता ५ वीचे विद्यार्थी गणित संबोध परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम, अध्यक्ष
राजन मडवळ, शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत सावंत, केंद्रप्रमुख महादेव देसाई, तसेच शिक्षिका रश्मी वाडकर, अस्मिता कासार, प्रियदर्शनी गावडे तसेच निता सावंत यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दोन्ही विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेस पात्र ठरले आहेत.
