राजन तेली यांचा टोला;शिवसेना सी वर्ल्ड, ग्रीन रिफायनरीसाठी सह्यांची मोहीम राबविणार का?
⚡कणकवली ता.१६-: केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून जिल्ह्यात फिरून दाखवावे असे म्हणणाऱ्या गौरीशंकर खोत यांनी जीभ सांभाळून बोलावे असा सूचक इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. गौरीशंकर
खोत यांच्यासोबत बसणारे सगळे केंद्रीयमंत्री राणेंच्या नजरेला नजर देण्याचीही हिम्मत करत नाहीत. खोत यांनी पत्रकार परिषद घेत असताना स्वतःच्या आजूबाजूला बसणारे कितीजण शिंदेगटाशी संपर्क ठेवून आहेत याचाही अभ्यास करावा असा टोला भाजपा
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला.सिंधुदुर्गात सरकारविरोधात युवा सेनेने सह्यांची मोहीम सुरु केली आहे. मग ३ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या ग्रीन रिफायनरीला,सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध शिवसेनेने का केला ? शिवसेना सी वर्ल्ड, ग्रीन रिफायनरीसाठी सह्यांची मोहीम राबविणार का? असा सवाल राजन तेली यांनी केला.
भाजपच्या कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी महाविकास आघाडी तसेच विरोधकांवर टीकेची झोड उठविली.
राजन तेली म्हणाले,वेदांता – फॉक्सकॉनवर राज्यात मागील ४ दिवस आरोप प्रत्यारोप करून वातावरण बिघडवण्याचे काम विरोधक करत आहेत.या कंपनीच्या संबंधात मागील राज्य सरकारचे कोणतेही करार झाले होते काय ? सिंधुदुर्गात सरकारविरोधात युवा सेनेने सह्यांची मोहीम सुरु केली आहे. मग ३ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या ग्रीन रिफायनरीला,सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध शिवसेनेने का केला ? सेना सी वर्ल्ड, ग्रीन रिफायनरीसाठी सह्यांची मोहीम राबविणार का?तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा देणाऱ्या नेत्यांनी आपण कोण? याचा विचार करुन बोलवे,कारण आजूबाजूला बसलेले लोक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांना लगावला आहे. पहिल्यांदा शिवसेना खासदार, आमदाराने प्रकल्पाबद्दल विरोधाची भूमिका सोडावी. रिफायनरी झाली असती तर विजयदुर्ग ते कोल्हापूर सहापदरी महामार्ग होणार होता, वैभववाडीला रेल्वे जंक्शन होणार होते, बहुतांश जमीनमालक ग्रीन रिफायनरीला जमीन देत सहकार्य करत आहेत, लाखोंचा रोजगार देणाऱ्या आणि कोकण आर्थिक संपन्न बनवणाऱ्या ग्रीन रिफायनरीला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विरोध का केला ? ग्रीन रिफायनरीला विरोध करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह कोकणातील लाखो युवक युवतीना रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
सिंधुदुर्गात शिवसेना वेदांत – फॉक्सकॉन वरून सह्यांची मोहीम राबवून पत्रकार परिषद घेताय तशीच मोहिम रिफायनरी प्रकल्पासाठी शिवसेना घेणार काय ? आशिया खंडातील एकमेव सी वर्ल्ड प्रकल्पाला शिवसेना आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी विरोध करून जनमत दूषित केले.लाखोंचा रोजगार देणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्पात कोणते पर्यावरणहानी करणारे दुष्परिणाम होते ? केवळ राजकीय फायद्यासाठी सी वर्ल्ड नाकारुन युवकांच्या हातातील रोजगार हिरावून घेणारी शिवसेना आता सी वर्ल्ड बाबत सह्यांची मोहीम राबविणार काय ? असाही सवाल तेली यांनी उपस्थित केला. ताज ग्रुप शेकडो कोटींची गुंतवणूक करून तारांकित हॉटेल सुरू करणार होते त्यालाही शिवसेनेने विरोध केला. सिंधुदुर्गातील 20 हजारहून अधिक युवक युवती आजघडीला गोव्यात नोकरी करतात. या सर्वांना सी वर्ल्ड, ग्रीन रिफायनरी, पंचतारांकित हॉटेल मुळे नोकरी मिळाली असती.या सर्वांचा रोजगार शिवसेनेने हिरावून घेतला असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला.
