ताडपत्री अनुदानापासून १३६ लाभार्थी वंचित

अनुदान जमा करण्याची मिलिंद मेस्त्री यांची मागणी

⚡कणकवली ता.१६-: कणकवली पंचायत समिती सेसमधून कृषी विभाग खात्याअंतर्गत ताडपत्री अनुदानापासून अजून १३६ लाभार्थी लाभापासून वंचित आहेत तरी त्यांचे अनुदान जमा करण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती कणकवलीचे माजी उपसभापती
मिलिंद मेस्त्री यांनी गटविकास अधिकारी कणकवली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

कणकवली पंचायत समिती सेसमधून कृषी विभाग खात्याअंतर्गत सन २०२०-२१ साठी शेतकऱ्यांसाठी ताडपत्री योजना राबविली होती. तसेच लाभार्थी ठरवून यादी मंजूर झाली होती. लाभाथ्र्यांनी खरेदीच्या पावत्या आपल्या कार्यालयाकडे सादर केल्या होत्या. परंतु सदर लाभार्थ्यांना पंचायत समिती सेस निधी मिळाला नाही असे सांगण्यात येते. अजून १३६ लाभार्थी लाभापासून वंचित असून याची दखल अद्याप आपल्याकडून घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमधून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. तरी आपणाकडून संबंधितांचे अनुदान त्वरीत जमा होण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही व्हावी. अशी मागणी मिलिंद मिस्त्री यांनी केली आहे.

You cannot copy content of this page