माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या सतर्कतेमुळे जखमी माकडाला जीवदान

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाले होते माकड

⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले सुंदरभाटले साईमंगल कार्यालया नजीकच्या विकास मोर्ये यांच्या कंपाऊंडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जख्मी होऊन पडलेल्या माकडास माजी नगराध्यक्ष संदेश निकम व माजी नगरसेविका सुमन निकम यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

वेंगुर्ला शहरातील सुंदरभाटले येथील साईमंगल कार्यालयाच्या नजिकच्या भागात सुमारे 7 ते 8 भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर हल्ला केला. यात गंभीरित्या जखमी झालेले माकडाने बचावाच्या उद्देशाने मारलेल्या उडीमुळे विकास मौर्य यांच्या घरा सभोवती घातलेल्या कंपाउंडवॉलच्या आतील भागात पडले. सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेने विकास मोर्ये आणि कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी स्थानिक माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम आणि माजी नगरसेविका सुमन निकम यांचेशी त्वरित संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती देत त्या गंभीर जख्मी माकडाला वाचविण्यासाठी त्वरित प्रयत्न करण्याचे विनंती केली. त्यानुसार माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. मठचे वनपाल एस. एस. कांबळे व वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी तात्काळ वनविभागाचे संतोष इब्रामपुरकर व शंकर पाडावे हे पाठविले. ते 10 मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या दोन्ही कर्मचाऱ्यांबरोबरच माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी, जखमी अवस्थेत भितीने पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माकडास तब्बल अर्ध्या तास पाठलाग करत गोणपाठात जेरबंद केले. त्यानंतर त्यानंतर त्या माकडास वेंगुर्ले येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले.त्यानंतर सदर माकडास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

You cannot copy content of this page