सी वल्ड प्रकल्पाचे शिवसेनेने तीन तेरा का वाजविले

वेदांता, फॉक्सकाँन वरून राज्य सरकारला डिवचणाऱ्या शिवसेनेला भाजपचा सवाल;भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांचा विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मालवण (प्रतिनिधी)

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल शिवसेना शिंदे-भाजपा सरकारचा निषेध करत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर नेणाऱ्या आणि लाखोजणांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे रोजगार देणाऱ्या सिवर्ल्ड प्रकल्पाला का विरोध केला ? जमिन मालकांमध्ये गैरसमज पसरवुन सिवर्ल्ड प्रकल्पाचे तीनतेरा का वाजवले ? याचे उत्तर शिवसेनेने द्यावे असे आव्हान भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिले आहे.

सिवर्ल्ड प्रकल्पासाठी त्यावेळी भाजपा सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमिन अधिकरण करण्यासाठी ३०० कोटी निधी उपलब्ध करून दिला होता. १५० एकर जमिन शेतकरी स्वत:हून देत होते. तसे सातबारा व हमीपत्र शेतकरी व जमिन मालकानी भाजपा कडे दिले होते. असे असताना सत्तेत असुनही शिवसेना विरोध का करत होती ? मग कोकणाच्या विकासाला कोणी खिळ घातली ? सद्यस्थिती पहाता सि-वर्ल्ड नियोजीत जागेत ना आधुनिक शेती झाली किव्हा शेती बागायतीचे लागवड क्षेत्र वाढले ना या जागेत नवीन प्रकल्प शिवसेनेने आणला. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असताना २५ वर्षात नविन विकसनशील प्रकल्प का आणला नाही यांची पण उत्तरे निषेध करताना देणे आवश्यक आहेत. सि-वर्ल्ड ने सिंधुदुर्गाचा चेहेरा मोहरा बदलला असता. स्कुबा व वॉटर स्पोर्टसने बऱ्यापैकी पर्यटन मालवणात वाढले आहे. मग सिवर्ल्ड आल्यावर परकिय चलनात मोठी वाढ झाली असती. परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले असते .असे न करता ना. नारायण राणेनी आणलेल्या प्रकल्पाना विरोध हा एककलमी कार्यक्रम राबवण्यात समाधान मानून शाश्वत विकासा पासुन कोकणवासीयाना वंचित ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प आलेच पाहिजे, या प्रकल्पाबाबत सकारात्मक भुमिका घेणारी शिवसेना कोकणातील विकासासाठी येणाऱ्या प्रकल्पाला का विरोध करते हे पण स्पष्ट करावे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी भूमिका सोडून रोजगार निर्मिती प्रकल्पाला पाठिंबा द्यावा असेही विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page