सात लाख ३४ हजाराची पकडली दारू

स्थानिक गुन्हा अन्वेषणची मध्यरात्री कारवाई;गोवा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो गाडीत सापडली दारू

ओरोस ता १५
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने बुधवारी मध्यरात्री सापळा रचत सिंधुदुर्गनगरी येथील जिजामाता चौक राष्ट्रीय महामार्गावर गोवा बनावटीची दारू अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. सात लाख ३४ हजार ४०० रुपयांची दारू जप्त केली आहे.
जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अवैध दारु व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. या पथकास १४ सप्टेंबर रोजी महिंद्रा बोलेरो गाडी क्र . एम एच 02 सी ई 7222 यामध्ये गोवा बनावटीची दारु भरून सदरची गाडी गोवा – मुंबई हायवेने कणकवलीच्या दिशेने येत असलेबाबत माहीती मिळाली होती. त्यावरुन या पथकाने पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांना सांगून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांचे नेतृत्वाखाली सापळा रचला.
१४ रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटे वाजताचे दरम्याने जीजामाता चौक, सिंधुदुर्गनगरी येथे बोलेरो गाडी क्र . एम एच – 02 सी ई – 7222 ही येत असल्याचे दिसून आले. ही गाडी थांबवून खात्री केली असता त्या कारमध्ये 7 लाख 34 हजार 400 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु मिळून आली. याबाबत बिगर परवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असताना मिळून आल्याने गाडीचा चालक याचे विरुध्द सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे गु.र.नं. 52/2022 , महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 ( अ ) ( ई ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या गुन्ह्यात 5 लाख 50 हजार रुपये किंमतीची बोलेरो गाडी क्र . MH – 02 – CE – 7222 व 7 लाख 34 हजार 400 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा मिळून 12 लाख 84 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
कारवाई अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे , प्रकाश कदम , अनुपकुमार खंडे , प्रमोद काळसेकर , अमित तेली , जयेश सरमळकर , चंद्रहास नार्वेकर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page